क्रियाकलाप

मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांची भेट
कर्जत कसारा किंवा विरार सारख्या भागामध्ये मुंबईच्या धक्क्यावरून मोठ्या प्रमाणात मास्यांची ने-आण केली जाते. लॉकडाउन असल्यामुळे लोकल मधून केवळ अत्यावश्यक सेवेच्या लोकाना जाण्याची मुभा असल्यामुळे मास्यांची ने-आण ही रस्त्यामार्फत होत आहे. त्यामुळे लागणारा वेळ व गाडी भाडे महाग पडत असून सामन्य लोकाना व आमच्या विक्रेत्याना त्याचा तोटा सहन करावा लागत आहे. म्हणून संघटनेचे अध्यक्ष श्री. समीर वानखेडे यानी मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांची भेट घेऊन मास्यांची ने – आण करण्यासाठी लोकल सेवा सुरु करणेबाबत विनंती केली. लवकरच यावर कारवाई करण्याचे आश्वासन मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यानी दिले.
लॉकडाउन मधील मुम्बई धक्क्याची पहाणी
लॉकडाउनमध्ये मासेमारी बंद असल्यामुळे धक्क्यावर अनपेक्षित लोकांचा वावर वाढला होता. त्यामुळे अनैतिक प्रकाराना रोकण्यासाठी व पुढील काळात मासेमारी सुरु होण्यापुर्वी धक्क्याची योग्य ती डागडूजी करण्यात यावी यासाठी मुम्बई मधल्या वेगवेगळया धक्क्यावर पाहाणी दौरा करण्यात आला. तसेच त्या निगडीत बि. पी. टी. व इतर शासकीय यंत्रणांशी सम्पर्क साधण्यात आला.
खार दांडा मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांची भेट
आज आम्ही खार दांडा मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांची भेट घेतली.. समाज बांधवाच्या समस्यांचा व नविन गोष्टीवर चर्चा झाली. महाराष्ट्र मच्छीमार आणि खरेदी विक्री संघाचे सदस्य ही उपस्थित होते.दांडा कोळी समाज व दांडा गावच्या सदस्यनी आमचे स्वागत करुन आमच्या बरोबर काम कराण्याचे संकेत दिले...!यात आला.