आमच्याबद्दल

संघटनेचे उद्देश आणि उदिष्टे (अभियान)

महाराष्ट्र मच्छिमार व खरेदि विक्री संघ महाराष्ट्रातील मच्छिमार व विक्रेता यांच्या उन्नत्तीसाठी व हक्कांसाठी कार्य करणारी संघटना असून मच्छिमार व मस्य व्यवसायाला एक नविन उद्धिष्टांबरोबर नवी उंची देणारी संघटना आहे. ही संघटना लोकाभिमुख कार्यक्रमाला प्राधान्य देणारी व सर्व सभासदांच्या हिताचे रक्षण करण्याचे उद्दिष्ट बाळगणारी आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात मत्स्यव्यवसायाचा महत्वाचा वाटा आहे. आर्थिकदृष्टया मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता रोजगार मिळण्यासाठी मत्स्यव्यवसाय क्षेत्र हे महत्वाचे साधन आहे. महाराष्ट्रातील मच्छिमार व मच्छिमार व्यवसायाला पारम्पारिक पद्धतीकडुन नविन आधुनिकतेकडे नेण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र मच्छिमार व खरेदि विक्री संघटनेचे आहे.
  • महाराष्ट्र मच्छिमार व खरेदि विक्री संघाच्या मार्फत महाराष्ट्रातील मच्छिमार व मच्छिमार व्यवसायाला पारम्पारिक पद्धतीकडुन नविन आधुनिकतेकडे नेणे.
  • मच्छिमार व खरेदि विक्री करण्यामध्ये समन्वय साधणे.
  • मच्छिमारांचे जीवनमान, आर्थिक, शैक्षणिकदर्जा उंचावणे व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भर देणे. तसेच योग्य लोकाना त्यासाठी सक्षम करणे.
  • मच्छिमार लोकान्मध्ये लहान मोठे विक्रेते, प्रांत, जाती याचा भेदभाव न करता योग्य त्या व्यक्तीला संधी देऊन मच्छिमार व विक्रेते यांची उन्नत्ती करण्याचा प्रयत्न करणे.
  • मच्छिमार व्यवसायात नव्याने नविन लोकाना आणणे.
  • मस्य व्यवसाय हा केवळ पारम्पारिक व्यवसाय नसून आधुनिक यांत्रिकी व आर्थिक सक्षमतेचा आहे हे लोकाना पटवुन देणे.
  • महाराष्ट्र व इतर भागात मास्यांच्या योग्य व चंगल्या प्रतीचा माल उपलब्ध करुन देणे.
  • मस्य विक्रेत्या बरोबरच सामान्य जनतेला चांगले मासे योग्य दरात उपलब्ध करुन देणे.
  • येत्या काळात शेतकरी, मासेमार व नवी पिढिला सोबत घेऊन शासनाच्या योजना राबविणे जेणे करुन बेरोजगारी यावर मात करता येईल.
  • आधुनिक तंत्रज्ञानाने चांगल्या प्रतीची पॅकिंग करून माल बाजारात आणणे जेनेकरून विक्रेते व ग्राहकाना तो हाताळणे सोईचे जाईल.
  • महाराष्ट्राच्या कानाकोप-यामध्ये लोकाना मस्य व्यवसायाविषयी माहिती व योग्य माल पुरविणे.
  • सामान्य जनतेची होणारी फसवणुक टाळुन ग्राहकाना योग्य दर उपलब्ध करुन देणे.
  • मस्य व्यवसाय व त्यात काम करणारे मच्छिमार व खलाशी, व्यापारी, विक्रेते यांच्या हिताचे व मस्य व्यवसायाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे उध्दिष्ट संघटनेचे असेल.

श्री. समिर सुदाम वानखेडे

अध्यक्ष महाराष्ट्र मच्छिमार व खरेदि विक्री संघ

मासेमारी व खरेदी विक्री क्षेत्रात स्वत:ची जयंत ट्रेडिंग कम्पनी व कन्यासागर व समीरसागर या नावाने मासेमारीच्या बोटी अशा प्रकारे नावारुपाला आलेले मासेमारी क्षेत्रातील १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले अध्यक्ष या नात्याने संघटनेचे काम करित आहेत. विविध क्षेत्रात अनुभवी शिवाय राजकारण व समाजकारण क्षेत्रातही यश सम्पादन केले असून महाराष्ट्र मच्छिमार संघटनेला एका नव्या उंचीवर नेण्याचा अध्यक्षांचा मानस आहे. मच्छिमार व व्यापारी यांच्यामध्ये योग्य तो समन्वय आणण्याचा आणि संघटनेला महाराष्ट्रामध्ये एका नव्या उंचीवर नेण्याचा उद्धीष्ट आहे.

श्री. सुधिर सुदाम वानखेडे

उपाध्यक्ष

मासेमारी क्षेत्रातील प्रदीर्घ काळ कामाचा अनुभव असुन त्यामुळे मासेमारांच्या गरजा, अडचणी यांची जाण आहे. अनुभवाच्या शिदोरीतून संघटनेसाठी व मासेमारांसाठी योग्य काम करण्याचा उद्धीष्ट समोर ठेवुन संघटनेमध्ये काम करीत आहेत.

श्री. राहुल महादेव हुंबरे

सचिव

मासेमारी हा व्यवसाय करीत असताना मच्छिमारांच्या, व्यवसायिकांच्या समस्यांची जाण आहे. त्यामुळे धंद्यातील होणारे नफे व तोटे याचा अभ्यास आहे. संघटनेसाठी सचिव या नात्याने प्रदीर्घ काळ काम करण्याचा व मस्य व्यवसाय संघटनेच्या धेय्य धोरणानुसार काम करण्याचा निश्चय आहे. अध्यक्ष व इतर सहकारी यांच्या मधे समन्वय ठेवणे, संघटना बळकट करणे हाच प्रण राहील.

श्रीम. शुभदा जगदीश पेठकर

खजिनदार

शासकिय व अर्थक्षेत्रात ३० वर्षांचा अनुभव. तेथील अथक सेवेनंतर संघटनेला योग्य त्या दिशेला नेण्यात आणि मच्छिमार खरेदी विक्रीमध्ये होणा-या आर्थिक गोष्टींचा अभ्यास करून संघटना व व्यवसाय यावर योग्य मार्गदर्शन करणे. शासकिय क्षेत्र व मासेमारी क्षेत्र यांत समन्वय साधणे. तसेच शासकिय योजना संघटनेच्या माध्यमातून मच्छिमारांपर्यंत नेणे हा संकल्प आहे.

श्रीम. शितल शिवाजीराव मोरे

महिला प्रमुख

सामान्य कुटुम्बातील असामान्य विचारसरणी बाळगून मस्य क्षेत्रात काम करित आहे. एक महिला म्हणुन मस्य क्षेत्रात काम करताना बराचसा संघर्ष करावा लागतो. खासकरून मच्छिमारी हा व्यवसाय परम्परेने महिलांचा असुन महिलाना येणा-या अडी-अडचणी, कुटुम्बाचा भार उचणे अशा असाधारण मस्य व्यवसायातील हजारो महिलांचे नेत्रुत्व करण्याचे व महिलाना मस्य क्षेत्रात अग्रेसर करण्याचा मानस आहे.तसेच राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर महिलाना नेण्याचे धेय्य आहे.

श्री. निरंजन दिलीप भोसले

सहसचिव

मासेमारी हा व्यवसाय करीत असताना मच्छिमारांच्या, व्यवसायिकांच्या समस्यांची जाण आहे. त्यामुळे धंद्यातील होणारे नफे व तोटे याचा अभ्यास आहे. संघटनेसाठी सचिव या नात्याने प्रदीर्घ काळ काम करण्याचा व मस्य व्यवसाय संघटनेच्या धेय्य धोरणानुसार काम करण्याचा निश्चय आहे. अध्यक्ष व इतर सहकारी यांच्या मधे समन्वय ठेवणे, संघटना बळकट करणे हाच प्रण राहील.

श्री. वसिम कादर शेख

सदस्य

मासेमारी क्षेत्रात एक विक्रेता म्हणून काम करीत असताना ग्राहकांच्या पसंती – नापसंतीची योग्य ती ओळख आहे. विक्रेता म्हणून काम करीत असताना येणा-या अडचणी यांवर संघटनेच्या मध्यमातून मात करणे व नविन येणा-या लोकाना मार्गदर्शन करण्याचा हेतू आहे.

श्री. रंजितकुमार ध्रुवचरण जेना

सदस्य

नाशिक सारख्या शहरामध्ये सागरी किनारा लाम्ब असूनही खा-या पाण्याचे मासे विकण्याचा व्यवसाय मागिल कित्येक वर्षे अविरत करीत आहेत. अशा क्षेत्रामध्ये ही ग्राहकांसाठी योग्य व चांगल्या प्रतीचे मासे उपलब्ध करून खवय्यांची इच्छापूर्ती करीत आहेत. महाराष्ट्राच्या अशा शहरातही मस्य व्यवसाय योग्य पद्धतीने चालविणे व संघटनेच्या माध्यमातून लोकाना योग्य ते मार्गदर्शन देण्याचा उद्देश रहिल.

श्री. कादर सय्यद

सदस्य

मच्छिमार क्षेत्रात नाविक म्हणून काम करीत असताना समुद्र, होड्या / बोटी, त्यांची होणारी रखरखाव करणे. समुद्रातील विविध मास्यांच्या जाती तसेच मासेमारी यांत निर्माण होणा-या अडचणी यांचा सखोल अभ्यास आहे. संघटनेच्या माध्यमातुन नविन मासेमाराना (नाखवा) नवी जहाज बांधणीसाठी मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडीअडचणीमध्ये समोरे जाण्याचा मानस आहे.

श्री. नासिर शेख

सदस्य

मच्छिमार क्षेत्रात खलाशी म्हणून काम करीत असताना एक साधारण कामगार, त्याचे काम, अडचणी आणि मिळणारा मोबदला या सर्व गोष्टींचा सखोल असा अभ्यास उराशी बाळगत संघटनेच्या माध्यमातून कामगार या क्षेत्रावर विशेष कार्य करण्याचा मानस आहे.